Madhumalti
"तु काय पाहत असतोस रे एकटक असा त्या झाडाकडे ?"विनयने नेहमीचाच प्रश्न पुन्हा विचारला . ऑफिसमध्ये नुकताच टी ब्रेक झाला होता .हातात वाफाळलेला चहाचा कप धरून विनय आणि अमेय गॅल्लरी मध्ये बराच वेळ उभे होते . ऑफिसचं कंपाऊंड गॅल्लरीतून दिसायचं . ह्या कंपाऊंड लगतच अशोकाची उंचच उंच झाडी आभाळाकडे नजर रोखत वाढली होती . त्यातल्या गेटला लागून असणाऱ्या झाडाकडे अमेय नेहमी एकटक पाहत असायचा .कधी टी ब्रेक मध्ये तर कधी घरी परतत असताना, निदान पाच एक मिनिट तरी हमखास थांबायचा झाडाच्या सावलीत . मंद मंद हसायचाही तो.मग अचानक आठवणीत हरवून जायचा .
आजही तसाच हरवला झाडाशी नजरेनेच बोलत . विनयने त्याचा उजवा खांदा गदागदा हलवला ,तसा तो भानावर आला .झाडात गुंतलेली नजर सोडवत तो खेसकला ,
"काय करतोयस विन्या चहा सांडेल "
"अम्या वेड लागलयं का तुला???झाडाला पाहतोस काय,मध्येच हसतोस काय ?? ....... ऑल ओके ना .
.means...... . "विनय विचारत होता ..
अमेयने स्मितहास्य केले . विनय पुरता गोंधळला .
"अम्या... मी तुझ्याशीच बोलतोय "
ह्यावेळी तो गप्पंच बसला तो . हसू क्षीण झालं. हळूहळू अन डोळ्यात आसवं तरळली .चहाच्या घोटसरशी त्याने गळ्याशी आलेला आवंढा हि गिळला .
" काही नाही चल कामाला लागू "अमेय उत्तरला .
"मला सांगायचं नाहीये का ,ok !!!!"विनय चिडलाच .
अमेयचा हात थरथरला . काही चुकार थेंब डोळ्यातून ओघळून रिकाम्या कपात टपटपले . विनयने त्याला सावरलं .जरासा हुंदका आवरत घेत , त्या झाडाकडे बोट दाखवत अमेय बोलू लागला ,
"विन्या नीट बघ त्या झाडाकडे ,त्याच्या निधड्या खोडावर एक सुंदर वेल सुद्धा वाढलीये . झाडावर सारा भार टाकून अलगद विसावलीये ती वेल झाडावर . ह्या झाडाला कधी फुले येत नाही,रुक्ष आहे हे झाड अशोकाच , पण वेलीवरच्या फुलांनी झाडाचा रुक्षपणा गेलाय . दिवसेंदिवस कसं बहरतं चालय हे झाड . झाडाने वेलीला जगण्याचा आधार दिला आणि वेलीने झाडाच जगणं सजवलं ....... फुलांनी ,कळ्यांनी ,मुलांनी सुगंधाने ......... कलरफुल लाईफ .... woww .....amezing आहे ना ........
"हो रे. , त्या मधुमालतीच्या वेलीबद्दल बोलतोय ना तू !!"
"हो वेलीबद्धल ही आणि ......... विनय ,माझ्या बायकोच नाव मधुमालती होत. तिच्याबद्दल
बोलतोय....... " अमेय उत्तरला .


Superb blog.manala touch karun gela kharch
ReplyDeleteThank you
DeleteKhuup chhan...ह्रदयस्पर्षी❤
ReplyDeleteThanks dear
ReplyDeleteKhup chan Di...����������
ReplyDeleteKhup mast... Worth reading 🙌🙌
ReplyDeleteThanks
Deleteखूप खूप सुंदर
ReplyDeleteThank you😊
DeleteThanku😊
ReplyDeleteWow. ... खुपच छान 👍
ReplyDeleteWow. ... खुपच छान 👍
ReplyDelete