Madhumalti
"तु काय पाहत असतोस रे एकटक असा त्या झाडाकडे ?"विनयने नेहमीचाच प्रश्न पुन्हा विचारला . ऑफिसमध्ये नुकताच टी ब्रेक झाला होता .हातात वाफाळलेला चहाचा कप धरून विनय आणि अमेय गॅल्लरी मध्ये बराच वेळ उभे होते . ऑफिसचं कंपाऊंड गॅल्लरीतून दिसायचं . ह्या कंपाऊंड लगतच अशोकाची उंचच उंच झाडी आभाळाकडे नजर रोखत वाढली होती . त्यातल्या गेटला लागून असणाऱ्या झाडाकडे अमेय नेहमी एकटक पाहत असायचा .कधी टी ब्रेक मध्ये तर कधी घरी परतत असताना, निदान पाच एक मिनिट तरी हमखास थांबायचा झाडाच्या सावलीत . मंद मंद हसायचाही तो.मग अचानक आठवणीत हरवून जायचा . आजही तसाच हरवला झाडाशी नजरेनेच बोलत . विनयने त्याचा उजवा खांदा गदागदा हलवला ,तसा तो भानावर आला .झाडात गुंतलेली नजर सोडवत तो खेसकला , "काय करतोयस विन्या चहा सांडेल " "अम्या वेड लागलयं का तुला???झाडाला पाहतोस काय,मध्येच हसतोस काय ?? ....... ऑल ओके ना . .means...... . "विनय विचारत होता .. अमेयने स्मितहास्य केले . विनय पुरता गो...