Posts

Showing posts from August, 2018

Madhumalti

Image
"तु काय पाहत असतोस रे एकटक असा त्या झाडाकडे ?"विनयने नेहमीचाच प्रश्न पुन्हा विचारला . ऑफिसमध्ये नुकताच टी ब्रेक झाला होता .हातात वाफाळलेला चहाचा कप धरून विनय आणि अमेय गॅल्लरी मध्ये  बराच वेळ उभे होते .  ऑफिसचं कंपाऊंड गॅल्लरीतून दिसायचं . ह्या कंपाऊंड लगतच  अशोकाची उंचच उंच झाडी आभाळाकडे नजर रोखत वाढली होती . त्यातल्या गेटला लागून असणाऱ्या झाडाकडे अमेय नेहमी एकटक पाहत असायचा .कधी टी ब्रेक मध्ये तर कधी घरी परतत असताना, निदान पाच एक मिनिट तरी हमखास थांबायचा झाडाच्या सावलीत . मंद मंद हसायचाही तो.मग अचानक आठवणीत हरवून जायचा .               आजही तसाच हरवला झाडाशी नजरेनेच बोलत . विनयने त्याचा उजवा खांदा गदागदा हलवला ,तसा तो भानावर आला .झाडात गुंतलेली नजर सोडवत तो खेसकला , "काय करतोयस  विन्या चहा सांडेल " "अम्या वेड लागलयं का तुला???झाडाला पाहतोस काय,मध्येच  हसतोस काय ?? ....... ऑल ओके ना . .means......  . "विनय विचारत होता .. अमेयने  स्मितहास्य केले . विनय पुरता गो...

Paus Devacha...

Image
अरे देवा तुझं वर घर   माझं खाली घर .....   तुला अन मला जोडणारी  पाठव एक सर .......  हिरवी दुलई त्यावर थेंबाची नक्षी,,,,,, विस्कटला ढगांचा काजळ  तरी मन मात्र उपाशी ......  अंधुकसं धुकं तरी पुसट पुसट दिसतं  ठाव ना ठिकाणा तुझा , शोधायचं का फक्त ????? ऎक ,,   ,, आधी मधी कधी तू खालीही उतरत जा ,,, मिसळून पावसात आमच्यात झिरपत जा .....  निगरगट्ट मनात  आमच्या भर थोडा पाऊस ''''''' मग बाहेर पाऊस ,, आत मनात पाऊस ,,, खोल डोळ्यात पाऊस ,,,,, फिटू दे ना सारी भिजायची हौस , एकदा फाटू दे ढग  मग बघ   कित्ती पाणी पाणी होईल  जग, नुसते पोकळ मातीचे क्षणात वाहून जातील , बुजऱ्या मनाचे कोलमडून पडतील ....... पण , भिजऱ्या मनाचेच तग धरतील , मनात तुझा ओलावा भरतील , पडत धडपडत का होईना आधार शोधतील '''''''' तुझ्या मायेच्या माऱ्यात जगून दाखवतील ........