Madhumalti


"तु काय पाहत असतोस रे एकटक असा त्या झाडाकडे ?"विनयने नेहमीचाच प्रश्न पुन्हा विचारला . ऑफिसमध्ये नुकताच टी ब्रेक झाला होता .हातात वाफाळलेला चहाचा कप धरून विनय आणि अमेय गॅल्लरी मध्ये  बराच वेळ उभे होते .  ऑफिसचं कंपाऊंड गॅल्लरीतून दिसायचं . ह्या कंपाऊंड लगतच  अशोकाची उंचच उंच झाडी आभाळाकडे नजर रोखत वाढली होती . त्यातल्या गेटला लागून असणाऱ्या झाडाकडे अमेय नेहमी एकटक पाहत असायचा .कधी टी ब्रेक मध्ये तर कधी घरी परतत असताना, निदान पाच एक मिनिट तरी हमखास थांबायचा झाडाच्या सावलीत . मंद मंद हसायचाही तो.मग अचानक आठवणीत हरवून जायचा .              
आजही तसाच हरवला झाडाशी नजरेनेच बोलत . विनयने त्याचा उजवा खांदा गदागदा हलवला ,तसा तो भानावर आला .झाडात गुंतलेली नजर सोडवत तो खेसकला ,
"काय करतोयस  विन्या चहा सांडेल "
"अम्या वेड लागलयं का तुला???झाडाला पाहतोस काय,मध्येच  हसतोस काय ?? ....... ऑल ओके ना .
.means......  . "विनय विचारत होता ..
अमेयने  स्मितहास्य केले . विनय पुरता गोंधळला .
 "अम्या...   मी तुझ्याशीच बोलतोय "
ह्यावेळी तो गप्पंच बसला तो  . हसू क्षीण झालं.  हळूहळू अन डोळ्यात आसवं तरळली .चहाच्या घोटसरशी त्याने गळ्याशी आलेला आवंढा हि गिळला .
" काही नाही चल कामाला लागू "अमेय उत्तरला .
"मला सांगायचं नाहीये का ,ok !!!!"विनय चिडलाच  .
अमेयचा हात थरथरला . काही चुकार थेंब डोळ्यातून ओघळून रिकाम्या कपात टपटपले . विनयने त्याला सावरलं .जरासा हुंदका आवरत घेत , त्या झाडाकडे बोट दाखवत अमेय बोलू लागला ,
"विन्या नीट बघ त्या झाडाकडे ,त्याच्या निधड्या खोडावर एक सुंदर वेल सुद्धा वाढलीये . झाडावर सारा भार टाकून अलगद विसावलीये ती वेल झाडावर . ह्या झाडाला कधी फुले येत नाही,रुक्ष आहे हे झाड अशोकाच , पण वेलीवरच्या फुलांनी झाडाचा रुक्षपणा गेलाय . दिवसेंदिवस कसं बहरतं चालय  हे झाड . झाडाने वेलीला जगण्याचा आधार दिला आणि वेलीने झाडाच जगणं सजवलं ....... फुलांनी ,कळ्यांनी ,मुलांनी सुगंधाने ......... कलरफुल लाईफ .... woww .....amezing आहे ना ........
"हो रे. , त्या  मधुमालतीच्या वेलीबद्दल बोलतोय ना तू !!"
"हो वेलीबद्धल ही आणि ......... विनय ,माझ्या बायकोच नाव मधुमालती होत.  तिच्याबद्दल
बोलतोय.......  " अमेय उत्तरला .

Comments

Post a Comment