Paus Devacha...

अरे देवा तुझं वर घर 
 माझं खाली घर ..... 


तुला अन मला जोडणारी 
पाठव एक सर ....... 
हिरवी दुलई त्यावर थेंबाची नक्षी,,,,,,
विस्कटला ढगांचा काजळ 
तरी मन मात्र उपाशी ...... 
अंधुकसं धुकं तरी पुसट पुसट दिसतं 
ठाव ना ठिकाणा तुझा , शोधायचं का फक्त ?????
ऎक ,,   ,,
आधी मधी कधी तू खालीही उतरत जा ,,,
मिसळून पावसात आमच्यात झिरपत जा ..... 
निगरगट्ट मनात  आमच्या भर थोडा पाऊस '''''''
मग बाहेर पाऊस ,,
आत मनात पाऊस ,,,
खोल डोळ्यात पाऊस ,,,,,
फिटू दे ना सारी भिजायची हौस ,
एकदा फाटू दे ढग 
मग बघ 
 कित्ती पाणी पाणी होईल  जग,
नुसते पोकळ मातीचे क्षणात वाहून जातील ,
बुजऱ्या मनाचे कोलमडून पडतील .......
पण ,
भिजऱ्या मनाचेच तग धरतील ,
मनात तुझा ओलावा भरतील ,
पडत धडपडत का होईना आधार शोधतील ''''''''
तुझ्या मायेच्या माऱ्यात जगून दाखवतील ........ 

Comments

Post a Comment